नवी दिल्ली : टी २० प्रॅक्टीस सामन्यात टीम इंडिया अे टीमने दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे. मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेला ८ विकेटने हरवलं. मयांक अग्रवालने ४९ चेंडूत ८७ रन्स केल्याने, दक्षिण आफ्रिकेला आठ विकेटने हरवण्यात यश आलं आहे.
युवा खेळाडूंच्या ए टीमने १९.४ षटकांत २ विकेट गमावून १९३ रन्स करून विजयावर शिक्कामोर्तब केला. याआधी पहिल्यांदा डुमिनीने ३२ चेंडूत ६८ रन्स केल्या, दक्षिण आफ्रिकाने पहिल्यांदा बॅटिंग करताना, तीन विकेट आणि १८९ रन्से केले.
भारतीय डावात सर्वच आकर्षणाची बाब होती, मयंक आणि मनन वोहरा यांच्यातील ११९ रन्सची पार्टनरशीप, मयंकने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज निष्प्रभ ठरवलं, त्याने ४९ चेंडूत १२ चौकार, आणि २ षटकार लगावत ८७ रन्स केले. तसेच अनेक दिवसांपासून फॉर्म खराब असलेल्या वोहराने ४२ चेंडूत ५६ रन्स केले, यात ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.