युवराजची नाबाद फटकेबाजी, पंजाब विजयी

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीची टी-20 क्रिकेट टूर्नामेंट  दिल्लीत फिरोजशाह कोटला स्टेडिअममध्ये सुरू आहे. यात पंजाबकडून खेळतांना युवराज सिंहने जोरदार फटकेबाजी केलीय, यामुळे पंजाबला हरियाणाचा सात विकेटने पराभव करण्यात यश आलंय.

Updated: Mar 25, 2015, 09:54 AM IST
युवराजची नाबाद फटकेबाजी, पंजाब विजयी title=

नवी दिल्ली : सैयद मुश्ताक अली ट्रॉफीची टी-20 क्रिकेट टूर्नामेंट  दिल्लीत फिरोजशाह कोटला स्टेडिअममध्ये सुरू आहे. यात पंजाबकडून खेळतांना युवराज सिंहने जोरदार फटकेबाजी केलीय, यामुळे पंजाबला हरियाणाचा सात विकेटने पराभव करण्यात यश आलंय.

युवराजची फटकेबाजी
या सामन्यात युवारज सिंहने २९ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकार लगावले, ५६ धावाकरून युवराज सिंह नाबाद राहिला. पंजाबकडून संदीप शर्माने ३४ रन्स देत ३ विकेट घेतल्या. दुसऱ्या सत्रात पालममध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात हिमाचल प्रदेशने लष्कराच्या टीमला ६ विकेटने हरवलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.