नवी दिल्ली : 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत. एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.
या परिषदेत 'वन डे' क्रिकेटमध्ये चार महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेत. हे नवीन नियम ५ जूलैपासून लागू होतील.
अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीने या सुधारित नियमांची शिफारस केली होती. गेल्या काही वर्षात लागू केलेल्या नवीन नियमांमुळे वन डे क्रिकेटमध्ये बॅटसमन अधिक भाव खाऊन जात होते. त्यामुळे, नियमांत बदल होण्याची गरज व्यक्त केली जात होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.