सचिन २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन

भारत रत्न सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन बनलाय. ऑस्ट्रेलियातील ऑनलाईन सर्व्हेमध्ये त्याला सर्वाधिक मतं मिळाली. क्रिकेट डॉट कॉम डॉट यूच्या सर्व्हेत १०० सर्वोत्तम टेस्ट प्लेअर्सपैकी सचिनची निवड झाली.

Reuters | Updated: Jun 25, 2015, 09:38 PM IST
सचिन २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन  title=

सिडनी : भारत रत्न सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन बनलाय. ऑस्ट्रेलियातील ऑनलाईन सर्व्हेमध्ये त्याला सर्वाधिक मतं मिळाली. क्रिकेट डॉट कॉम डॉट यूच्या सर्व्हेत १०० सर्वोत्तम टेस्ट प्लेअर्सपैकी सचिनची निवड झाली.

श्रीलंकेचा धडाकेबाज बॅट्समन कुमार संगकारा दुस-या, तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज विकेटकीपर बॅट्समन अॅडम गिलख्रिस्ट तिस-या स्थानावर आहे. सचिनला या सर्व्हेमध्ये २३ टक्के मतं मिळाली. तर संगकाराला १४ टक्के मिळाली. 

या सर्व्हेत टॉप टेनमध्ये स्थान मिळवणारा सचिन एकमेव भारतीय ठरलाय. टॉप टेनमध्ये ऑस्ट्रेलियाचे चार, दक्षिण आफ्रिकेचे तीन आणि श्रीलंकेच्या दोन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरनं २०० टेस्ट खेळून क्रिकेटला अलविदा केला होता. क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही सचिनचं गारुड क्रिकेटप्रेमींवर अजूनही कायम असल्याचं यातून सिद्ध होत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.