मारिया शारापोव्हानं विचारलं, 'कोण सचिन तेंडुलकर?'

ती एक खेळाडू आहे... यशाचं सर्वोच्च शिखर तिच्यापासून फार दूर नाही... पण, तिला या शिखराजवळ जाताना सचिन तेंडुलकर कोण? हेही माहीत नाही... ही खेळाडू आहे टेनिस सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हा...

Updated: Jul 2, 2014, 08:06 PM IST
मारिया शारापोव्हानं विचारलं, 'कोण सचिन तेंडुलकर?' title=

मुंबई : ती एक खेळाडू आहे... यशाचं सर्वोच्च शिखर तिच्यापासून फार दूर नाही... पण, तिला या शिखराजवळ जाताना सचिन तेंडुलकर कोण? हेही माहीत नाही... ही खेळाडू आहे टेनिस सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हा...

भरल्या डोळ्यांनी साऱ्या जगानं सचिनला क्रिकेटमधील निवृत्तीला निरोप दिला तेव्हाच्या प्रत्येक क्षणानं तुमच्या अंगावर आजही रोमांच उभा राहत असेल... पण, टेनिस जगताच्या या राणीला मात्र सचिन तेंडुलकर कोण? हे माहित नाही... tennisworldusa.org या बेवसाईटनं ही बातमी दिलीय.

विम्बल्डनचा चाहता आणि नेहमीच इथं भेट देणारा सचिन तेंडुलकर यंदाही शनिवारी रॉयल बॉक्समध्ये उपस्थित होता. यावेळी त्याच्यासोबत इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅम, गोल्फर इआन पाऊल्टर आणि इंग्लंडचा माजी क्रिकेट कॅप्ट अँन्ड्र्यू स्ट्रॉस हेदेखील उपस्थित होते.

पण, मारिया शारापोव्हा हिला रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या खेळाडूंविषयी विचारण्यात आलं तेव्हा मात्र तिनं आपणं केवळ बॅकहॅमला ओळखतो, असं म्हटलं. तिला तेंडुलकर कोण हे देखील माहीत नव्हतं.

‘डेव्हिड बॅकहॅम आला तेव्हाच सचिन तेंडुलकरही इथं उपस्थित झाला होता... तुला माहित आहे सचिन कोण आहे ते?’ असा प्रश्न जेव्हा मारिया शारापोव्हाला विचारण्यात आला तेव्हा मारियानं तत्काळ उत्तर दिलं... ‘नाही... मला सचिन तेंडुलकर माहीत नाही’... हे नाव आपण यापूर्वी कधी ऐकलंच नसल्याचं मारियानं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.