नवी दिल्ली : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असेलल्या माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आलाय.
यामुळे अझहरुद्दीनचं एचसीएच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठीचं स्वप्न भंग पावलंय. कोणत्या कारणामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आलाय. हे समजू शकलेलं नाही.
दरम्यान, उमेदवारी अर्ज रद्क केल्यानंतर अझहरुद्दीननं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. हायकोर्टानं जर मला सर्व आरोपातून मुक्त केलंय तर आपला अर्ज अपात्र का ठरवण्यात आला असा सवाल अझरुद्दीननं उपस्थित केलाय.