मोहाली : क्रिकेटमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. टी-२० वर्ल्डकपचा इतिहास पाहिला असता जो संघ उपविजेता असेल तर त्याच्या पुढील वर्षी तो संघ जिंकतो. असे टी-२० वर्ल्डकपमध्ये दोनवेळा घडलेय. या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास भारत यंदा वर्ल्ड चॅम्पियन बनू शकतो.
२००७च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान उपविजेता ठरला होता. मात्र त्यानंतर २००९मध्ये पाकिस्तानने जेतेपद मिळवले. याचप्रमाणे २०१२ मध्ये श्रीलंकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण २०१४मध्ये श्रीलंकेने भारताला नमवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हा इतिहास पाहता गेल्या वर्ल्डकपमध्ये भारत उपविजेता राहिलाय त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी आहे.