हाँगकाँग ओपन, सिॆंधूची सेमीफायनलमध्ये धडक

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने आपला दमदार फॉर्म कायम राखताना हाँगकाँग ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

Updated: Nov 25, 2016, 04:18 PM IST
हाँगकाँग ओपन, सिॆंधूची सेमीफायनलमध्ये धडक title=

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने आपला दमदार फॉर्म कायम राखताना हाँगकाँग ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

क्वार्टरफायनलमध्ये तिने सिंगापूरच्या झियोऊ लियांगला तिने 21-17, 21-23, 21-18 असे नमवले. सेमीफायनलमध्ये तिची लढत सायना नेहवाल आणि हाँगकाँगच्या चेंग नगन यीशी होईल.

पहिला गेम स्वस्तात जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूला लियांगकडून कडवी टक्कर मिळाली. या गेममध्ये लियांगने बाजी मारत गेम आपल्या नावे केला. मात्र तिसऱ्या गेममध्ये सिंधूने चांगला खेळ करत बाजी मारली आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.