महिला पत्रकाराशी क्रिस गेलचे "Live" फ्लर्टिंग, टीकेची झोड

क्रिस गेल मैदानावर आपल्या धडकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण मैदानाच्या बाहेरही त्याचा वागणुकीमुळे नेहमी चर्चेत असतो. ती आयपीएलची पार्टी असो वा हॉस्पिटलमध्ये लेडी नर्ससोबत काढलेल्या सेल्फी असो. तो नेहमी चर्चेत असतो. 

Updated: Jan 4, 2016, 08:49 PM IST
महिला पत्रकाराशी क्रिस गेलचे "Live" फ्लर्टिंग, टीकेची झोड title=

मेलबर्न :  क्रिस गेल मैदानावर आपल्या धडकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण मैदानाच्या बाहेरही त्याचा वागणुकीमुळे नेहमी चर्चेत असतो. ती आयपीएलची पार्टी असो वा हॉस्पिटलमध्ये लेडी नर्ससोबत काढलेल्या सेल्फी असो. तो नेहमी चर्चेत असतो. 

ऑस्ट्रेलियाच्या टी-२० लीग बिग बॅशमॅचमधील एका मॅचमध्ये १५ चेंडूत ४१ धावा बनिवणाऱ्या गेलला एका महिला पत्रकाराने इनिंगबद्दल विचारले तेव्हा त्याने त्या रिपोर्टरला मॅचनंतर ड्रिंक्स आणि डेटवर जाण्याची ऑफर दिली. 

गेल जेव्हा आपला इनिंग खेळल्यावर डगआउटमध्ये पोहचल्यानंतर चॅनल टेनची रिपोर्टर मेल मॅकलॉगलिन बोलायला आली. ती आल्यानंतर गेलने फ्लर्ट करणे सुरू केले. तो म्हटला की मी अशी खेळी केली की मी स्वतः येऊन इंटरव्ह्यू देऊ शकेल. केवळ तुझ्या डोळ्यासाठी मी ही खेळी केली. तुझे डोळे खूप सुंदर आहे. मला वाटते की आम्ही सामना जिंकल्यावर तू माझ्यासोबत ड्रिंक घ्यायला येशील. आता लाजू नको बेबी... 

गेलच्या या विचित्र वागणूकीनंतर रिपोर्टर म्हटली की मी लाजत नाही आहे. 

गेलच्या या वागणुकीनंतर त्यावर टीकेची झोड उठली आहे. इंग्लडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफ याने गेलच्या या वक्तव्याला निराशाजनक म्हटले आहे. गेल ज्या पद्धतीने वागला ते खूप चुकीचे आहे. त्याला अशा प्रकारे बोलले नाही पाहिजे होते. 

हा पहिला प्रकार नाही... 
या पूर्वीही गेल अशा प्रकारच्या वादात फसला आहे. २०१४मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये जमैकामध्ये गेलला एका फिमेल रिपोर्टरने विचारले की ट्रेनिंग आणि वातावरणानुसार पीच कसे असेल.... त्यावर गेल म्हटला. मी तुला अजून टच केला नाही, त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही. यानंतरही त्यावर खूप टीका झाली होती.