सिडनी : क्रिकेटच्या मैदानात कधीच आपल्या भावना व्यक्त न करणारा स्टीव वॉ ह्युजच्या जाण्यानं मात्र अगदीच भावूक झाला आहे. ह्युजच्या जाण्याच्या माझ्या मुलावर खूप मोठा परिणाम झाला आहे, अंस स्टीवनं सांगितलं.
ह्युजच्या जाण्याची गोष्ट ऐकून माझा मुलगा आस्टीन खूप रडला. वॉनं 'सिडनी मार्निंग हेराल्ड'शी बोलताना सांगितलं की, 'ह्युज नेहमी माझ्या मुलासोबत खूप गप्पा मारायचा. जेव्हा मी आस्टिनला त्याच्या जाण्याची बातमी दिली तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले' तो म्हणाला की ह्युज एक साधा माणूस होता.
जेव्हा मी आस्टीनला घेउन चेंजिंग रूममध्ये जायचो तेव्हा ह्युज मला हॅलो करून आस्टीनसोबत खूप वेळ गप्पा मारायचा. त्याला नेहमी चांगला क्रिकेटर कसा असावा या विषयी तो सांगत असे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.