अफगाणिस्तानचा स्कॉटलँडवर रोमहर्षक विजय, मॅचच्या ५ खास बाबी

वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचं २११ रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९.२ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून गाठलं. 

Updated: Feb 26, 2015, 03:17 PM IST
अफगाणिस्तानचा स्कॉटलँडवर रोमहर्षक विजय, मॅचच्या ५ खास बाबी title=

ड्यूनेडिन: वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचं २११ रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९.२ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून गाठलं. 

मॅचच्या ५ खास बाबी पाहा-

१. अफगाणिस्तानचा क्रिकेट वर्ल्डकपमधील हा पहिला विजय आहे. स्कॉटलँडच्या २१० रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करत अफगाणिस्ताननं हा विजय मिळविला.

२. हे पाचव्यांदा आहे की, नवव्या विकेटवर बॅटिंग करतांना कोणत्या टीमनं विजय मिळवलाय. यापूर्वी २००७मध्ये दोन वेळा १९८७, १९७५मध्ये एक-एक वेळा नवव्या विकेटवर बॅटिंग करणाऱ्या टीमनं विजय मिळवलाय.

३. अफगाणिस्तानचा बॅट्समन समीउल्लाह शेनवरीनं या मॅचमध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवले. स्कॉटलँडच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना समीउल्लाहनं ९६ रन्सची खेळी केली. हा त्याचा वनडेमधील आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोअर आहे. 

४. हे दुसऱ्यांदा आहे की, वर्ल्डकप मॅचदरम्यान नवव्या विकेटनं १००हून अधिक रन्स बनवले. यापूर्वी १९८३ मध्ये भारत आणि झिम्बाव्वेच्या मॅचमध्ये नवव्या विकेटवर खेळतांना १०० रन्स बनवले होते. 

५. वर्ल्डकप क्रिकेटमध्ये स्कॉटलँडनं पहिल्यांदा २०० हून अधिक रन्स बनवले. यापूर्वी २००७मध्ये साऊथ आफ्रिकाविरुद्ध स्कॉटलँडने १८६ रन्स बनवले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.