२२ वर्षांनंतर श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी 'विराट' सेना सज्ज

टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. तीन मॅचची सीरिज आहे. कॅप्टन विराट कोहली पाच बॉलर्ससह मैदानात उतरणार आहे. टेस्ट सीरिजसाठी खास आक्रमक रणनीती त्यानं आखलीय.

Updated: Aug 12, 2015, 09:13 AM IST
२२ वर्षांनंतर श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी 'विराट' सेना सज्ज title=

गाले : टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. तीन मॅचची सीरिज आहे. कॅप्टन विराट कोहली पाच बॉलर्ससह मैदानात उतरणार आहे. टेस्ट सीरिजसाठी खास आक्रमक रणनीती त्यानं आखलीय.

महेंद्रसिंह धोनीकडून कोहलीला सिडनीमध्ये टेस्ट टीमची जबाबदारी सोपविण्यात आली होती. भारतानं त्यानंतर बांगलादेशविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच खेळली. पण कॅप्टन म्हणून कोहलीसाठी ही पहिलीच पूर्ण सीरिज आहे. कोहलीनं आक्रमक नेतृत्व करण्याचं आश्वासन दिलंय.   

कोहलीनं सर्वप्रथम धोनी दुखापतग्रस्त असताना अ‍ॅडलेड टेस्ट मॅचमध्ये टीमचं नेतृत्व केलं होतं. भारताला या मॅचमध्ये ४२ रन्सनी पराभव स्वीकारावा लागला होता, पण कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली होती. त्यानं दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली होती.

त्यानंतर कोहलीनं फतुल्लाहमध्ये बांगलादेशविरुद्ध पाच बॉलर्सना संधी दिली. या मॅचमध्ये दिग्गज स्पिनर हरभजन सिंगनं पुनरागमन केलं होतं. स्नायूच्या दुखापतीमुळं मुरली विजयनं पहिल्या टेस्टमधून माघार घेतली आहे. त्यामुळं कोहलीकडे युवा लोकेश राहुलला संधी देण्याचा सोपा पर्याय आहे.

फलंदाजीबाबत विचार करता अजिंक्य रहाणे पाचव्या स्थानी खेळणार असल्याचं निश्चित आहे. रोहित शर्मा, कोहली आणि वृद्धिमान साहा यांची सराव सामन्यातील कामगिरी निराशाजनक होती. हे फलंदाज फॉर्मात नाहीत, असं वक्तव्य करणं घाईचं ठरलं. कारण ते महिनाभराच्या ब्रेकनंतर खेळत आहेत.

कोहलीने ऑस्ट्रेलियात शानदार बॅटिंग करताना कसोटी मालिकेत चार सेंच्युरी ठोकली होती, पण त्यानंतर त्याला वनडेमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नाही.  

दरम्यान, श्रीलंकेचा महान बॅट्समन कुमार संगकारानं निवृत्तीची घोषणा केलीय. त्यामुळं ही त्याची अखेरची सीरिज आहे. 

अशी असेल टीम- 

भारत : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि वरुण अ‍ॅरॉन.

श्रीलंका : अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (कॅप्टन), लाहिरू थिरीमाने, कौशल सिल्वा, दिमुथ करुणारत्ने, कुमार संगकारा, दिनेश चंडीमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कुशल परेरा, रंगाना हेराथ, दिलरुवान परेरा, थारिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्व फर्नांडो आणि दुष्यंता चमीरा (फिटनेसवर अवलंबून)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.