मोहाली टेस्टचा पहिला दिवस भारताचा, इंग्लंड 268/8

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी केली आहे.

Updated: Nov 26, 2016, 04:50 PM IST
मोहाली टेस्टचा पहिला दिवस भारताचा, इंग्लंड 268/8 title=
सौजन्य : बीसीसीआय

मोहाली : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं 268 रनवर आठ विकेट गमावल्या आहेत.

टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन एलिस्टर कूकनं पहिले बॅटिंग करायचा निर्णय घेतला पण सुरवातीपासूनच इंग्लंडला धक्के बसले. स्कोअरबोर्डवर 87 रन असताना इंग्लंडला चार धक्के बसले यानंतर बेअरस्टो- स्टोक्सनं आणि बेअरस्टो- बटलरनं इंग्लंडचा डाव सावरला.

भारताकडून उमेश यादव, जयंत यादव आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोनं सर्वाधिक 89 रन केल्या.