... म्हणजे कोहलीच्या ऑर्डरवर ठरेल अखेरच्या वनडेचं भविष्य

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दोन्ही टीमकडून जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळणार आहे. होमपीचवर सामना होत असल्यामुळं टीम इंडियासाठी ही जमेची बाजू मानली जातेय. 

Updated: Oct 25, 2015, 09:13 AM IST
... म्हणजे कोहलीच्या ऑर्डरवर ठरेल अखेरच्या वनडेचं भविष्य title=

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दोन्ही टीमकडून जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळणार आहे. होमपीचवर सामना होत असल्यामुळं टीम इंडियासाठी ही जमेची बाजू मानली जातेय. 

अधिक वाचा - धोनीने चक्क मैदानावर कार चालवून लुटला आनंद

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील ही पाचवी वनडे मालिका आहे. याआधीच्या चारपैकी तीन मालिका पाहुण्या दक्षिण आफ्रिकेनं गमावल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी २००५मध्ये पार पडलेली मालिका बरोबरीत सुटली होती. आधीच्या चार मालिकामधील १५ पैकी सहा सामने दक्षिण आफ्रिकेनं गमावलेत.

कोहलीच्या ऑर्डरवर ठरेल अखेरच्या वनडेचं भविष्य

टीम इंडियाचा उप-कप्तान विराट कोहलीनं सांगितलं की, तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत स्वत:ला खूप सहज मानतो. कोहलीच्या चेन्नर्ईमध्ये १३८ रन्सच्या दमदार खेळीनं भारताला विजय मिळवून दिला. तिथं मैदानात कोहली तिसऱ्या नंबरवर उतरला होता. भारतानं ती मॅच ३५ रन्सची जिंकत सीरिजमध्ये बरोबरी साधली.
आता सीरिज जिंकण्यासाठी आजची मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची आहे.

कोहलीनं सांगितलं की, त्यानं अधिकाधिक तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या क्रमांकावरील माझी खेळी यशस्वी राहिल्याचं कोहली म्हणतो. कोहलीला कानपूर, इंदूर आणि राजकोटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळावं लागलं होते. 

अधिक वाचा - Video धोनीने विराटच्या दिशेने स्टंप फेकला आणि...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.