ब्राझील-जर्मनीमध्ये आज सेमी फायनल

 ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्याने ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.

AP | Updated: Jul 8, 2014, 07:54 AM IST
ब्राझील-जर्मनीमध्ये आज सेमी फायनल  title=

ब्राझील : ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्याने ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.
 
ब्राझीलचा विदआऊट नेमार इथुनपुढचा प्रवास सुरु झाला आहे. त्यातच समोर जर्मनसारखी आक्रमक आणि बलाढ्य सेना उभी ठाकणार असल्याने ब्राझीलच्या गोटात तस चिंतेचच वातावरण आहे. तर दुसरीकडे यजमान ब्राझीलला धक्का देण्याचे मनसुबे जर्मनीच्या गोटात रचले जात असणार हे नक्की. क्वार्टर फायनलमध्ये नेमार दुखापतग्रस्त झाल्याने तो वर्ल्ड कपमधून आऊट झालाय. यामुळे या स्टार स्ट्रायकरविनाच ब्राझीलला आता आपली ताकद दाखवावी लागणार आहे. त्यातच कॅप्टन थियागो सिल्वालाही गेल्या मॅचमध्ये दुस-यांदा यलो कार्ड मिळाल्याने तोदेखील या मॅचला मुकणार आहे.

आता नेमारच्या जागी विलियनला तर सिल्वाच्या जागी डान्टेला उतरवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जर्मनीच्या गोटातली फारस काही आलबेल आहे अस नाही. जर्मनीही दुखापतग्रस्त मुस्ताफीविना रणांगणात उतरेल. पेर मर्टसॅकरला इतर काही प्लेअर्सप्रमाणे फ्लू झाल्याने त्याच्या टेस्ट सुरु आहेत. मात्र, जर्मनीचा थॉमस मूलर मोक्याच्या क्षणी आपली उपयुक्तता सिद्ध करु शकतो. तर गोलकिपर मॅन्युएल न्यूएरला भेदन्याचं प्रमुख आव्हान सांबा टीमसमोर असेल.

या मुकाबल्यात ब्राझील 4-2-3-1 तर जर्मन 4-3-3 अस फॉर्मेशन ठेवण्याची शक्यता आहे. 2002च्या फायनलनंतर या दोन्ही टीम्स प्रथमच वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने उभ्या ठाकणार आहेत. 2002मध्ये ब्राझील जर्मनीला 2-0ने पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरल होत. याशिवाय 2002 नंतर ब्राझील एकदाही होम ग्राऊंडवर पराभूत झालेली नाही. आत्तापर्यंत या दोन्ही टीम्स 21वेळा एकमेकांशी भिडल्या आहेत. यामध्ये जर्मनी केवळ चारवेळाच विजयी होऊ शकलीय तर तब्बल 12वेळा जर्मनीला पराभवाच तोंड पाहाव लागलय.

होम ग्राऊंड आणि इतिहासाच्या आकड्यांवर नजर टाकल्याच ब्राझीलच पारड जरी जड वाटत असल तरी ब्राझीलची सध्याची टीम ही कमकुवत मानली जात असून नेमारच्या आऊट होण्यामुळे टीमवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कणखर जर्मन ब्राझीलला त्यांच्याच घरात मात देण्यासाठी आतूर असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.