लंडन : लीव्हरपूल युनिवर्सिटीच्या रग्बी टीमच्या महिला खेळाडूंनी ब्रेस्ट कँन्सरच्या चॅरटीसाठी पैसा गोळा करण्यासाठी एक अनोखा प्रकार केला आहे. टीमच्या खेळाडूंनी पैसा जमा करण्यासाठी एक कॅलेंडर तयार केले आहे त्यात त्या विना कपड्याच्या दिसल्या आहेत.
वेबसाईट मिररने दिलेल्या बातमीनुसार गेल्या वर्षी खेळाडूंननी चॅरिटीसाटी २ हजार पौंडपेक्षा अधिक पैसा गोळा केला होता. हे कँलेंडर खूप लोकप्रिय झाल होते. हे कँलेंडर अमेरिका, हाँगकाँग आणि नायजेरियापर्यंत पोहचले होते.
टीमच्या कर्णधार इव वॅटन म्हटल्या की कॅलेंडरच्या माध्यमातून पैसा गोळा करण्यात खूप मदत झाली. वॅटन म्हणाल्या आम्ही या कामासाठी आम्ही कोपाफील या संस्थेला निवडले आम्हांला वाटते की महिलांना आरोग्यदायी राहावे, प्रत्येक तरूणी या चॅरिटीसाठी तयार झालेल्या कॅलेंडरला पसंद करत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.