'आयपीएल फिक्सिंगमध्ये तीन खेळाडूंना दाऊदनं केला होता संपर्क...'

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या 'डी फॉर डॉन' या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या पुस्तकात त्यांनी आयपीएल फिक्सिंग दरम्यान राजस्थान रॉयल्स टीमचे तीन खेळाडू दाऊदच्या संपर्कात होते, असा दावा केलाय. 

Updated: Nov 20, 2015, 06:37 PM IST
'आयपीएल फिक्सिंगमध्ये तीन खेळाडूंना दाऊदनं केला होता संपर्क...' title=

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या 'डी फॉर डॉन' या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या पुस्तकात त्यांनी आयपीएल फिक्सिंग दरम्यान राजस्थान रॉयल्स टीमचे तीन खेळाडू दाऊदच्या संपर्कात होते, असा दावा केलाय. 

अजित चंडीला, श्रीसंत आणि अंकित चव्हाण हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या संपर्कात होते, असं नीरज कुमार यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, या तीनही खेळाडूंना कोर्टाकडून क्लीन चीट मिळालीय. 

नुकत्याच एका मुलाखतीतही नीरज कुमार यांनी आपल्या या दाव्याचा उल्लेख केला होात. या तिन्ही खेळाडूंची नावं दाऊदसोबत जोडण्यात आली होती, असं त्यांनी म्हटलंय.

२०१३ मध्ये आयपीएल संदर्भात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आपल्यालाही संपर्क केला होता, असा दावाही नीरज कुमार यांनी या पुस्तकात केलाय. 'साहेब, तुम्ही रिटायर होतायत तर आता तरी पिछ्छा सोडा...' अशी गळ त्यानं आपल्याला घातली... पण, पुढे काही म्हणणार त्याआधीच त्यानं फोन कट केला, असं त्यांनी यात म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, आयपीएल फिक्सिंग प्रकरणात दाऊदबरोबरच अनेक लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेत. हे प्रकरण नीरज कुमार यांच्याच कार्यकाळात घडलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.