युरो चषक स्पर्धेला सुरुवात

जगभरातल्या फुटबॉल प्रेमींसाठी खूषखबर. यूरो फूटबॉल 2016 स्पर्धा फ्रान्समध्ये सुरू झाली आहे. 

Updated: Jun 11, 2016, 08:13 AM IST
 युरो चषक स्पर्धेला सुरुवात title=

पॅरिस : जगभरातल्या फुटबॉल प्रेमींसाठी खूषखबर. यूरो फूटबॉल 2016 स्पर्धा फ्रान्समध्ये सुरू झाली आहे. 

युरोपातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या युरो चषक 2016 स्पर्धेचा पहिला सामना फ्रान्स आणि रोमानिया संघात रंगला. 

या सामन्यात फ्रान्सनं रोमानियाचा 2 - 1 असा पराभव केला. फ्रान्सच्या बारा विविध शहरांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण 24 देश सामील होणार आहे. 

तब्बल महिना भर रंगणाऱ्या यास्पर्धेचा अंतिम सामना 10 जुलैला खेळवण्यात येणार आहे.