वेलिंगटन : न्यूझिलंडची क्रिकेट टीम झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये न्यूझिलंडच्या टीमनं भारतात जन्मलेल्या जीत रावलची निवड केली आहे. जीत रावल हा ओपनिंग बॅट्समन आहे. जीत रावल याच्याबरोबरच न्यूझिलंडच्या टीममध्ये भारतातच जन्मलेल्या इश सोदीचीही वर्णी लागली आहे.
27 वर्षांचा जीत रावल भारतामध्ये जुनियर लेव्हल क्रिकेट खेळला आहे. 2004 मध्ये तो आपल्या कुटुंबासह न्यूझिलंडमध्ये स्थायिक झाला. न्यूझिलंडची टीम झिम्बाब्वेविरुद्ध 29 जुलैपासून पहिली आणि 6 ऑगस्टपासून दुसरी टेस्ट खेळणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर न्यूझिलंडची टीम डरबनमध्ये आणि सेंच्युरिअनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन टेस्ट खेळणार आहे. 19 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला या टेस्ट होणार आहेत.