दिनेश कार्तिकनं वाढवला 'गोल्डन पत्नी'चा उत्साह!

स्क्वॉश प्लेअर दीपिका पल्लिकल हिनं जोशना चिनप्पासोबत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. या क्षणाचा साक्षीदार बनलाय क्रिकेटर आणि दीपिकाचा पती दिनेश कार्तिक... 

Updated: Aug 3, 2014, 03:52 PM IST
दिनेश कार्तिकनं वाढवला 'गोल्डन पत्नी'चा उत्साह! title=

ग्लासगो : स्क्वॉश प्लेअर दीपिका पल्लिकल हिनं जोशना चिनप्पासोबत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. या क्षणाचा साक्षीदार बनलाय क्रिकेटर आणि दीपिकाचा पती दिनेश कार्तिक... 

दिनेश कार्तिक मॅच दरम्यान मैदानात उपस्थित राहिला. यावेळी त्यानं आपल्या पत्नीचा आणि तिच्या सहकाऱ्याचा उत्साह वाढवण्याचाही प्रयत्न केला.

दीपिकाही आपल्या पतीच्या उपस्थितीनं खूपच खूश होती. तिनं हा आनंद तिच्या चाहत्यांशी ट्विटरवर शेअर केलाय. मॅचनंतर गोल्ड मेडलसोबत दीपिकानं दिनेश कार्तिकसोबत आपला एक फोटो काढून ट्विटरवर शेअर केलाय. ‘या जादूमय दिवशी माझा पतीही माझ्यासोबत असल्यानं मी खूप खूश आहे’ असं दीपिकानं याफोटोसोबत म्हटलंय. 

महत्त्वाचं म्हणजे, कॉमनवेल्थ इतिहासात पहिल्यांदाच स्क्वॉशमध्ये भारताला पदक प्राप्त झालंय. दीपिका आणि जोशनानं स्क्वॉशच्या महिला दुहेरीच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या जॅनी डन्काफ आणि लॉरा मासैरो यांना 11-6 नं हरवून एक नवा इतिहास कायम केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.