कॉमनवेल्थ : दीपिका - जोशनानं रचला इतिहास

 दीपिका पल्लिकल आणि जोशना चिनप्पा यांनी स्क्वॉशमध्ये सुवर्ण पदक मिळवून एक नवा इतिहास रचलाय. 

Updated: Aug 3, 2014, 03:54 PM IST
कॉमनवेल्थ : दीपिका - जोशनानं रचला इतिहास  title=

ग्लासगो : दीपिका पल्लिकल आणि जोशना चिनप्पा यांनी स्क्वॉशमध्ये सुवर्ण पदक मिळवून एक नवा इतिहास रचलाय. 

दीपिका आणि जोशनानं स्क्वॉशच्या महिला दुहेरीच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या जॅनी डन्काफ आणि लॉरा मासैरो यांना 11-6 नं हरवून एक नवा इतिहास कायम केलाय. 

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला स्क्वॉशमध्ये दीपिका आणि चिनप्पा यांच्यामुळे पहिल्यांदाच पदक प्राप्त झालंय.   

आत्तापर्यंत, भारतानं ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये 61 पदकांवर ताबा मिळवलाय. यात, 14 गोल्ड, 28 सिल्व्हर तर 19 ब्रांझ पदकांचा समावेश आहे. याचबरोबर, कॉमनवेल्थच्या टॅलीत भारतानं आपलं पाचवं स्थान कायम राखलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.