स्वातंत्र्यदिनाला ‘कॅप्टन कूल’ धोनी झाला भावूक!

स्वातंत्र्यदिनाला डौलात फडकलेला तिरंगा पाहताना प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभा राहतो... अनेक जण भावूक होतात... तुम्ही क्वचितच ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला भावूक झालेलं पाहिलं असेल... पण, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं त्यालाही आपल्या भावना अनावर झालेल्या दिसल्या.

Updated: Aug 15, 2014, 04:11 PM IST
स्वातंत्र्यदिनाला ‘कॅप्टन कूल’ धोनी झाला भावूक! title=
फाईल फोटो

मुंबई : स्वातंत्र्यदिनाला डौलात फडकलेला तिरंगा पाहताना प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभा राहतो... अनेक जण भावूक होतात... तुम्ही क्वचितच ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला भावूक झालेलं पाहिलं असेल... पण, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं त्यालाही आपल्या भावना अनावर झालेल्या दिसल्या.

एका वेबसाईटसाठी लिहिलेल्या लेखात ‘कॅप्टन कूल’नं आपल्या या भावना मांडल्यात. drcricket7.com या वेबसाइडवर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं एक भावूक लेख लिहलाय. शहिद जवानांच्या आठवणीत लिहिलेल्या लेखात तो म्हणतोय, ‘आपण कितीही पैसे कमावले तरी आपल्या देशापेक्षा कोणीच मोठं नाही’…

‘आज स्वातंत्र्य दिवस आणि मी माझ्या टीम बरोबर इंग्लंड दौऱ्यावर आहे शाळेपासून मला या दिवसाच  महत्त्व माहीत आहे. आजचा दिवस हा आपला स्वातंत्र दिवस आहे आणि यामुऴे मी माझा आनंद आपला देशातील नागरिकांबरोबर साजरा करत आहे’, असंही यावेळी धोनीनं सांगितलंय.
 
क्रिकेट आणि भारतीय सैन्य यामध्ये साधर्म्यही यानिमित्तानं साधलंय. क्रिकेट टीम आणि भारतीय सैन्यात देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळी भाषा बोलणारे सहभागी होतात... पण, जेव्हा त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी किंवा शत्रू असतो, तेव्हा धर्म आणि भाषा यांपलिकडे जाऊन ते प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवतात, असंही या लेखात धोनीनं म्हटलंय.  
 
आपल्या लेखाचा शेवट करताना धोनी भावूक होत म्हणतो... ‘आमच्यासाठी देशाच प्रतिनिधित्व करणं खूप अभिमानस्पद आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सैनिकांना विसरुन चालणार नाही… ते आपल्यासाठी दिवस रात्र सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असतात, आपल्या प्राणाची आहुती देतात. आज स्वातंत्र्यदिनी सर्व भारतीय खूप गर्वित होतो तसंच आपल्या देशाचा झेंडा फडकावताना आणि राष्ट्रगीत ऐकताना भावनाशील होतो... भारत देश तुला सलाम’
                                                                                                                                                                            

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.