धोनीचं मौन कायम, चाहत्यांच्या मनाला हुरहूर!

रिटायरमेंट घेऊन धोनीला आज चार दिवस होतील. मात्र त्याच मौन अजूनही कायम आहे. त्याच्या रिटायरमेंटबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत, तर कुणी दु:ख व्यक्त करतयं तर कुणी टीका... मात्, मिस्टर कूल यावर काहीही भाष्य करण्यास तयार नाही. रिटायरमेंटचा निर्णय त्याने ज्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकारी प्लेअर्सना सांगितला तेव्हा धोनी जी दोन वाक्य बोलला त्यात खूप काही दडलेल आहे. 

Updated: Jan 2, 2015, 11:05 PM IST
धोनीचं मौन कायम, चाहत्यांच्या मनाला हुरहूर! title=

मुंबई : रिटायरमेंट घेऊन धोनीला आज चार दिवस होतील. मात्र त्याच मौन अजूनही कायम आहे. त्याच्या रिटायरमेंटबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत, तर कुणी दु:ख व्यक्त करतयं तर कुणी टीका... मात्, मिस्टर कूल यावर काहीही भाष्य करण्यास तयार नाही. रिटायरमेंटचा निर्णय त्याने ज्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकारी प्लेअर्सना सांगितला तेव्हा धोनी जी दोन वाक्य बोलला त्यात खूप काही दडलेल आहे. 

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने अगदी आपल्या वक्तिमत्त्वाला साजेशी टेस्ट क्रिकेटमधून एक्झिट घेतली. मात्र अनपेक्षित आणि तडकाफडकी त्यानं घोषीत केलेली रिटायरमेंट साऱ्यांनाच धक्का देऊन गेली. नेहमीचं सारासार विचार करणाऱ्या धोनीनं अशा पद्धतीने सीरिजदरम्यान रिटायरमेंट का घोषित केली असावी? याचं उत्तर अजूनही त्याच्या चाहत्यांना मिळालेलं नाही आणि मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. 

धोनीनं रिटायरमेंट का घेतली असावी याबाबत अनेक कयास लावले जात आहेत. परदेशी भूमीवरील पराभव, आयपीएल फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरण तर कोहली आणि शास्त्री यांची जवळीक अशी अनेक कारण चर्चिली जात आहेत. मात्र धोनीने अजूनही स्वत: याबाबत काहीही व्यक्तव्य केलेल नाही. किंबहुना ज्यादिवशी त्यानं रिटायरमेंटची घोषणा केली त्यादिवशीही त्याच्या चेहऱ्यावरील एकही पुसटशी रेषा तो रिटायरमेंट जाहीर करेल अस वाटत नव्हतं.

मात्र मेलबर्न टेस्ट ड्रॉ होऊनही त्यानं त्यादिवशी स्टंप घेतला आणि बॉलही अंपायरकडून मागून घेतला. हे साऱ्यांनी पाहिलं मात्र तरीही तो रिटायरमेंट वैगरे जाहीर करेल अस वाटत नव्हतं. पत्रकार परिषदेतही त्यानं याबाबत ब्र सुद्धा काढला नाही आणि रिटायरमेंटचे संकेतही दिले नाहीत. तो नेहमीप्रमाणे शांतपणे मीडियाला सामोरा गेला. आपल्या रिटायरमेटंबाबत बीसीसीआयशी बोललो असल्याची कुठलीही चाहूल त्यानं लागू दिली नाही. मात्र, त्यानंतर संजय पटेल यांना फोन केल्यानंतर धोनीने ड्रेसिंग रुममध्ये आपल्या रिटायरमेंटची घोषणा केली आणि ड्रेसिंग रुममधील प्लेअर्स भावूक झाले. 
 
'विराटच्या रुपाने टीमला एक नव नेतृत्त्व मिळत आहे. तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायचं शारीरिक आणि मानसिक दडपण मला सहन होत नसल्यामुळे मी रिटायरमेंट घेत आहे' धोनीच्या केवळ या दोन वाक्यांनी ड्रेसिंगरुमध्ये भयाण शांतता परसरली. प्रत्येक प्लेअर भावूक झाला होता. पण तरीही धोनी तेवढाच शांत होता. कारण त्याच्या डोक्यात आता पुढील विचार सुरु झाले होते. 
 
धोनी अगदी आपल्या स्टाईलमध्ये टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. मात्र त्याच्या या तडकाफडकी जाण्यानं त्याचे चाहते आणि टीम इंडियामधील प्लेअर्सना नक्कीच दु:ख झाल आहे.
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.