लंडन : भारतीय वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग बऱ्याच कालावधीनंतर एकत्र एकाच टीममधून खेळणार आहे. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर एका चॅरिटी सामन्यात अनेक आंतराराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळणार आहेत.
धोनी आणि सेहवागच्या टीममध्ये पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि दक्षिम आफ्रिकेचा हर्शल गिब्स असणार आहे. हे हेल्प फॉर हिरोज इलेवन असणार आहे. या संघाचा कर्णधार इंग्लडचा अँड्र्यू स्ट्रॉस असणार आहे. तर मॅनेजर इयान बॉथम आहे.
या संघाचा सामना रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेवनशी होणार आहे. त्यात ब्रॅडम मॅक्युलम, मॅथ्यू हेडन, महेला जयवर्धने, ग्रॅमी स्मिथ सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या शिवाय न्यूझीलंडचा स्काट स्टायरस, डॅनिअल व्हिटोरी आणि अफगाणिस्तानचा शापूर जदरान हे देखील खेळणार आहे. टीमचे कोच गॅरी कर्स्टन आणि मॅनेजर सुनील गावस्कर असणार आहे. त्यानंतर इन्क्रेडीबल हेल्प फोर हीरोज क्रिकेट क्लब आणि इंग्लंड फिजीकल डिसएबिलिटी टीम यांच्यात एक टी-२० सामना होणार आहे.
धोनी म्हणाला या सर्व स्टार प्लेअरसोबत खेळण्यासाठी उत्सूक आहे. हा सामना चांगल्या कामासाठी खेळला जाणार आहे. मला नेहमी इंग्लडमध्ये खेळताना मजा येते. सर्व क्रीडा रसिकांनी या सामन्याची मजा लुटावी, असे मी आवाहन करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.