इंग्लंडमधील पराभवानंतर धोनीला दिग्गजांचा पाठिंबा

Updated: Aug 20, 2014, 07:26 PM IST
इंग्लंडमधील पराभवानंतर धोनीला दिग्गजांचा पाठिंबा title=

इंग्लंडमध्ये चारीमुंड्याचीत झालेल्या टीम इंडियाला आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चहुबाजुने टीकेला सामोर जावे लागले होते. मात्र, धोनीच्या पाठिशी लिटिल मास्टर सुनील गावसकर आणि विख्यात फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मण उभे राहिले आहेत.

धोनीने फंलदाजी केली नसती तर भारताला आणखी अपमानास्पद पराभव स्विकारावा लागला असता. धोनीने पाच कसोटीमध्ये चार अर्धशतकं केली आहेत, असे गावकसर म्हणालेत.

धोनीने ओल्ड ट्रॅफर्ड आणि ओवल या मैदानावर केलेल्या रन्समुळे भारतीय टीम 100 रन्सपर्यंत पोहोचू शकली, असं मत गावसकर यांनी व्यक्त केलं. तर लक्ष्मणच्या मते धोनी हा कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणारा कर्णधार असून नेहमी आपल्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणारा खेळाडू आहे. पण त्याला संघाची साथ न मिऴाल्याने इंग्लडमध्ये भारतावर ही गंभीर स्थिती ओढावली आहे.

संघ सुरुवातीच्या 10 षटकात जेव्हा बाद होतो तेव्हा कर्णधारला कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागते. कारण यामध्ये कर्णधाराची चूक नसते तर खेऴाडू चूक करत असतात असं मत लक्ष्मणने व्यक्त केलं. धोनीने भारताला गौरव वाटेल, असे क्षण दिले आहेत. ज्यामुळे जगात भारतीय क्रिकेट सघांचा दबदबा निर्माण झाल्याचे लक्ष्मणने म्हटले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.