मुंबई: भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्टेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५च्या सुरू असलेल्या सेमीफायनलपूर्वी गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू आहेत.
गूगलच्या सर्व्हेनुसार भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या मॅचपूर्वी कॅप्टन धोनीला सर्वाधिक लोकांनी सर्च केलं. यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि शिखर धवनचं नाव येतं.
गूगलनं एका वक्तव्यात म्हटलं की, भारतीय बॉलर्समध्ये ज्याला सर्वाधिक लोकांनी शोधलं त्यात मोहम्मद शामी नंबर वनवर आहे. त्यानंतर उमेश यादव, आर. अश्विन आणि मोहित शर्माचं नाव आहे.
गूगलनुसार, मॅक्सवेलनंतर शेन वॉटसन, डेव्हिड वार्नर, मायकल क्लार्क आणि मिचेल स्टार्कला ऑस्ट्रेलियन टीममध्ये सर्वाधिक सर्च केलं गेलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.