या भारतीय क्रिकेटरच्या बायकोकडून कोहलीला आव्हान

भारताचा स्टार बॅट्समन आणि टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Updated: May 4, 2016, 07:25 PM IST
या भारतीय क्रिकेटरच्या बायकोकडून कोहलीला आव्हान title=

मुंबई: भारताचा स्टार बॅट्समन आणि टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बीसीसीआयनं विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. पण विराट कोहलीला या पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघातल्या खेळाडूच्या पत्नीकडूनच आव्हान मिळत आहे. 

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकलच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे. दीपिका ही दिनेश कार्तिकची बायको आहे. फक्त 24 व्या वर्षीच दीपिकानं स्क्वॉशमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

विराट कोहली आणि दीपिकाबरोबरच निशाणेबाज जीतू राय, गोल्फर अनिर्बान लाहिरी आणि एथलीट टिंटू लुका हे खेळाडूही खेल रत्नच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे खेळाच्या क्षेत्रातला देशातला हा सर्वोच्च पुरस्कार कोण पटकावणार याची उत्सुकता वाढली आहे.