वर्ल्डकप आधी हा कॅप्टन होणार निवृत्त

मार्च २०१६ मध्ये  भारत टी-20 वर्ल्ड कपचा यजमान देश असणार आहे. जवळपास १ महिना चालणाऱ्या टी-20 वर्ल्डकप आधी क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. कारण एका धडाकेबाज कॅप्टनने तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.

Updated: Dec 22, 2015, 04:08 PM IST
वर्ल्डकप आधी हा कॅप्टन होणार निवृत्त title=

नवी दिल्ली : मार्च २०१६ मध्ये  भारत टी-20 वर्ल्ड कपचा यजमान देश असणार आहे. जवळपास १ महिना चालणाऱ्या टी-20 वर्ल्डकप आधी क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. कारण एका धडाकेबाज कॅप्टनने तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.

एक धडाकेबाज ओपनर आणि न्यूझिलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅक्युलम याने ऑस्ट्रेलिया सोबतच्या सिरीजनंतर संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. २० फेब्रुवारीला मॅक्युलम शेवटचा १०१ वा आंतरराष्ट्रीय टेस्ट सामना खेळेल.

आगामी टी-20 वर्ल्डकपही खेळणार नसल्याचं मॅक्युलमनं जाहीर केलंय.  त्यामुळे त्याच्यानंतर न्यूझिलंडच्या टीमची धुरा ही श्रीलंकेत खूपच चांगला खेळ करुण दाखवणाऱ्या केन विलियम्स याच्या हातात जाणार आहे.

९९ टेस्ट मॅचमध्ये मॅक्युलमने ११ शतक आणि ३१ अर्धशतक ठोकत ६२७३ रन्स केले आहेत. टेस्टमध्ये त्याने सर्वाधिक ३०२ रन्स केले आहेत. तर २५४ वनडेमध्ये त्याने ५ शतक आणि ३१ अर्धशतक ठोकत त्याने ५९०९ रन्स केले आहे. वनडे मध्ये त्याने सर्वाधिक १६६ रन्स केले आहेत.