संसार थाटण्याच्या तयारीत लागलाय विराट!

दुसऱ्या टेस्ट सीरिजमध्ये 1-1ची बरोबरी केल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आता थोडा आराम करण्याच्या मूडमध्ये दिसतोय. तिसऱ्या टेस्टपूर्वी नुकतेच टीम इंडियाचे खेळाडून ऑटोमध्ये फिरतांना दिसले आणि काही खेळाडू बॅडमिंटन खेळतांना दिसले.

Updated: Aug 27, 2015, 04:14 PM IST
संसार थाटण्याच्या तयारीत लागलाय विराट! title=
सौजन्य- इंस्टाग्राम

नवी दिल्ली/कोलंबो: दुसऱ्या टेस्ट सीरिजमध्ये 1-1ची बरोबरी केल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आता थोडा आराम करण्याच्या मूडमध्ये दिसतोय. तिसऱ्या टेस्टपूर्वी नुकतेच टीम इंडियाचे खेळाडून ऑटोमध्ये फिरतांना दिसले आणि काही खेळाडू बॅडमिंटन खेळतांना दिसले.

आणखी वाचा - आजकल या अभिनेत्रीसोबत डेटिंग करत आहे युवराज!

यादरम्यान कोलंबोमध्ये कॅप्टन कोहली काही वेगळंच काम करतांना दिसला. नुकतीच एक बातमी आली होती की विराट आपलं घर शिफ्ट करण्याच्या तयारीत आहे.

आता स्वत: विराटनं यावर शिक्कामोर्तब केलंय. इंस्टाग्रामवर विराटनं शॉपिंगचा एक फोटो शेअर केलाय, ज्यात तो काही भांड्यांची खरेदी करतांना दिसतोय. विराटनं कोलंबोतून एक फोटो शेअर केला, त्यात काही चमचे आणि घरातील भांडे दिसत आहेत. यावरून स्पष्ट होतंय विराट नवा संसार थाटण्याच्या तयारीला लागलाय.

घर बदलणार की विराट अनुष्कासोबत संसार थाटणार असाही विचार या फोटोवरून येतो. टीम इंडियाचा मोस्ट इलिजिबल बॅचलर लग्नाची तयारी तर करत नाहीय ना... 

आणखी वाचा - डेल स्टेनने विकेट काढताना स्टम्पचा तुकडाच पाडला

काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आता जुनं मीरा बाग, पश्चिम विहारवालं घर सोडून गुडगावला शिफ्ट होणार आहे. या बातमीनंतर विराटच्या सोसायटीतील काही लोकं उदास झाले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.