फ्रान्सचे पाणी पितो विराट कोहली

मनुष्याच्या जीवनात पाण्याचे महत्त्व सर्वाधिक आहे. माणूस केवळ न खाता जिवंत राहू शकतो मात्र पाण्याशिवाय जगणे कठीण. बाहेर पडताना लोक अनेकदा आपल्यासोबत पाण्याची बाटली जवळ बाळगतात. जेणेकरुन बाहेर पाणी खरेदी करण्याची वेळ येऊ नये. कारण पाणी सामान्य किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विकले जाते. 

Updated: Apr 22, 2017, 10:00 PM IST
फ्रान्सचे पाणी पितो विराट कोहली title=

नवी दिल्ली : मनुष्याच्या जीवनात पाण्याचे महत्त्व सर्वाधिक आहे. माणूस केवळ न खाता जिवंत राहू शकतो मात्र पाण्याशिवाय जगणे कठीण. बाहेर पडताना लोक अनेकदा आपल्यासोबत पाण्याची बाटली जवळ बाळगतात. जेणेकरुन बाहेर पाणी खरेदी करण्याची वेळ येऊ नये. कारण पाणी सामान्य किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विकले जाते. 

मात्र भारतातील अनेक क्रिकेटर तसेच बॉलीवूड सेलिब्रेटी असे आहे जे पिण्यासाठी जे पाणी वापरतात ते केवळ परदेशातूनच येते इतकेच नव्हेत तर त्याची किंमतही अधिक असते. एका लीटरसाठी हजारो रुपयांपर्यंत खर्च होतो. याचे उदाहरण म्हणजे भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली.

विराट एव्हियन नावाचे मिनरल पाणी पितो जे फ्रान्समधून येते. या पाण्याच्या एका लीटरच्या बाटलीची किंमत तब्बल ६०० रुपये आहे. म्हणजेच जर दिवसाला २ दोन लीटर पाणी घेतल्यास महिन्याला कोहली तब्बल ३६ हजार रुपयांचे पाणी पितो.