मुंबई : क्रिकेट वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये अनेक वर्षांनंतर महाराष्ट्राची केदार जाधवची निवड झाली आहे.
३० खेळाडूंच्या संभाव्य संघात केदारची निवड झालीय. १९९९ मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ऋषीकेश कानिटकरची अंतिम संघात निवड झाली होती. त्यानंतर वर्ल्डकपच्या संघात निवड होणारा केदार दुसराच महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. केदारच्या निवडीनंतर त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाय.
ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड येथे होणा-या २०१५च्या वर्ल्ड कप करिता मुंबई येथील बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या भारतीय निवड समितीने संभावित ३० क्रिकेटर्सची यादी जाहीर केली.
या संभावितांमधून २०११ वर्ल्ड कप विजयी टीममधील युवराज सिंग, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि झहीर खान या दिग्गजांना वगळण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.