बोगोटा : कोलंबियाचा यजमान ब्राझीलशी फूटबॉल वर्ल्डकप २०१४ च्या क्वार्टरफायनलमध्ये सामना होणार आहे. याचीच, पूर्वतयारी म्हणून कोलंबियानं बोगोटामध्ये पीठ आणि शेव्हिंग फोमवर बंदी आणलीय.
या सामन्यासाठी फूटबॉलवेड्या या देशातील हजारो उत्साही लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. कोलंबियामध्ये लोक शेव्हिंग क्रिम फेकून किंवा पीठाचे 'बॉम्ब' फोडून आपला आनंद व्यक्त करताना दिसतात.
पण, पोलिसांना मात्र या प्रकाराला आळा घालायचाय... अशा प्रकारांमुळे वाद, हाणामाऱ्याही होऊ शकतात, असा पोलिसांचा कयास आहे. मॅच दरम्यान पोलीस राजधानीत तैनात राहतील. इथं मॅचच्या दिवशी दारू विक्रीवरही बंदी घालण्यात आलीय.
कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सांतोस फोर्टालेजामध्ये आपल्या टीमच्या या मॅचचा आनंद घेतील. त्यांना आपल्या देशवासियांना शांततेचं आवाहन केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.