पाहा फिफा वर्ल्ड कपमधील कोण आहे गूगल सर्चमध्ये अव्वल

 सध्यासुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपचं क्रेझ सगळ्या दुनियाभरच्या लोकांवर आहे. फुटबॉल वर्ल्डकपसाठीची एक्साइटमेन्ट, गोल, चुकलेला गोल, चांगले खेळ, अॅक्शन आणि गोंधळ हे चाहत्यांसाठी आठवण बनून जाते. याच कारणाने हल्ली गूगलवर फूटबॉल, गोल आणि फूटबॉल खेळाडूंना जास्त सर्चिंग करणं वाढलंय. 

Updated: Jul 3, 2014, 03:43 PM IST
पाहा फिफा वर्ल्ड कपमधील कोण आहे गूगल सर्चमध्ये अव्वल title=

ब्राझील : सध्यासुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपचं क्रेझ सगळ्या दुनियाभरच्या लोकांवर आहे. फुटबॉल वर्ल्डकपसाठीची एक्साइटमेन्ट, गोल, चुकलेला गोल, चांगले खेळ, अॅक्शन आणि गोंधळ हे चाहत्यांसाठी आठवण बनून जाते. याच कारणाने हल्ली गूगलवर फूटबॉल, गोल आणि फूटबॉल खेळाडूंना जास्त सर्चिंग करणं वाढलंय. 

गूगलने मनोरंजन आठवडा म्हणून साजरा करण्याच्या हेतूने ऑनलाइन चाहत्यासाठी फिफाच्या संबंधित काही खास क्षणांना हायलाईट केलं आहे. त्यात इंटरनेटवर फिफाच्या संबंधित 
लोकप्रिय सर्च केलेल्यांची लिस्ट आहे.  

ज्यात कोलंबियाला क्वॉटर फायनलमध्ये पोहचवणारा जेम्स रोड्रिगेज हा सर्वात जास्त सर्च करणारा खेळाडू बनला आहे. जेम्सने या वर्ल्ड कपमध्ये पाच गोल केले आहेत. 

  • - रॉबिन वॅन परसीचा फ्लाईंग गोल हा फिफातला सर्वात आठवणीचा क्षण ठरला असल्याने तो गोल सारखा सारखा इंटरनेटवर पाहिला जातोय. 
  • - बोस्नियाच्या विरुद्ध मेसीचा पहिला गोल इंटरनेटवर सर्च होणारा दुसरा लोकप्रिय क्षण आहे. 
  • - फुटबॉल चाहते डेम्पसीचा फास्टेस्ट गोल सुध्दा खूप सर्च केला जातोय. या अमेरिकेतील खेळाडूनं घानाच्या विरुद्ध असलेल्या सामन्यात ३० सेकंदात गोल केला होता. 
  • - फिफा २०१४ मध्ये इटलीच्या विरोधात असलेल्या मॅचच्या दरम्यान डॅनियल स्टरिगने गोल केल्यानंतर त्यांनी जल्लोष केला होता. तो त्याचा आनंद इंटरनेटवर सर्च केला जातो.  
  • - क्रिस्टियानो रोनाल्डो गूगलच्या ट्रेनिशल सर्चमध्ये सर्वात वरती आहे. जरी त्याची टीम पोर्तुगाल, वर्ल्डकप मधून पहिलीच बाहेर झाली असली तरीही. 
  • - इंग्लंड आणि इटली दोन्ही टिम वर्ल्डकपमधून बाहेर गेली असली तरी इंग्‍लंड आणि इटली मॅच सर्वात जास्त वेळा सर्च केली जाते. 
  • - फुटबॉल टिमचे मॅनेजर आणि कोच देखील इंटरनेटवर खूप सर्च केले गेले. ब्राझीलचा कोच लुइस फिलिप स्कॉलेरी ऑनलाइन दर्शकांचे जास्त पसंतीचे राहिले आहे. 
  • - या फिफा वर्ल्डकप २०१४ च्या मॅच सोबत खेळांडूसोबत त्यांची गर्लफ्रेंडस, हेअरस्टाईलसाठी खूप चर्चित आहेत. 
  • - नेमार हेअरस्टाईल सर्वात लोकप्रिय ठरलाय. त्याच्यासोबत रोनाल्डो आणि डेविड लुईसच्या हेअरस्टाईल ही खूप पसंती आली आहे. 
  • - स्पॅनिश डिफेंडर गेरार्ड पिकची पार्टनर शकीरा आणि रोनाल्डोची सुपरमॉडल गर्लफ्रेंड इरिना शाक ही खूप सर्च करण्यात आल्या आहेत. 
  • - मॅच रेफरी यिनची निशीमुरा आपल्या विवाहाच्या गोष्टीला घेउन खूप चर्चेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.