महेंद्रसिंग धोनीने क्लाईव्ह लायड यांचा मोडला रेकॉर्ड

वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील शेवटच्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने सिक्स मारून मॅच जिंकली आणि एक रेकॉ्र्ड आपल्या नावे केला. धोनीने वेस्टइंडीजच्या यशस्वी कॅप्टन लाईव्ह लायडचा वर्ल्ड कपमध्ये सलग १० मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड मोडलाय. 

Updated: Mar 14, 2015, 05:47 PM IST
महेंद्रसिंग धोनीने क्लाईव्ह लायड यांचा मोडला रेकॉर्ड title=

ऑकलॅंड : वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील शेवटच्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने सिक्स मारून मॅच जिंकली आणि एक रेकॉ्र्ड आपल्या नावे केला. धोनीने वेस्टइंडीजच्या यशस्वी कॅप्टन लाईव्ह लायडचा वर्ल्ड कपमध्ये सलग १० मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड मोडलाय. 

वेस्टइंडीजने लाईव्ह लायड कॅप्टन असताना  सलग ९ मॅच जिंकल्या होत्या. भारताने ग्रुप ए मध्ये ६ मॅच जिंकल्या आणि वर्ल्ड कपमध्ये सलग १० मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. यापूर्वी वर्ल्ड कप २०११ मध्ये ४ मॅच जिंकल्या होत्या. 

वेस्टइंडीजने लाईव्ह लायड यांच्या नेतृत्वात वर्ल्ड कप १९७५ ते वर्ल्ड कप 1983 मध्ये सलग ९ मॅच जिंकल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक २४  मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने ८मॅच जिंकल्या होत्या.त्यामळे धोनीच्या रेकॉर्ड लिस्टमध्ये आणखी एका रेकॉर्डची भर पडली आहे.