ऑकलंड : झिम्बॉम्वेविरुद्ध मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचा बॅटसमन सुरेश रैना यानं आपल्या कॅप्टनची तोंड भरून स्तुती केलीय. नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या धोनीच्या खास टीप्स आजही कामी आल्यानंच टीमला विजय मिळवणं सहज सोप्पं झाल्याचं रैनानं म्हटलंय. रैनानं नाबाद ११० रन्स दिलेत.
आमच्या मेहनतीचं फळ मिळालं याचा आम्हाला आनंद आहे. धोनी आल्यामुळे आम्हाला खूपच मदत मिळालीय. मला सकारात्मक पद्धतीनं चतुराईनं खेळायचं होतं... खासकरून पावरप्लेमध्ये... मला आनंद आहे की टीमला विजयप्राप्तीपर्यंत घेऊन जाण्यात आम्ही यशस्वी राहिलो, असं सुरेश रैनानं म्हटलंय.
धोनीनं आणि मी एकत्र अनेक मॅचेस खेळल्यात आणि शेवटपर्यंतही घेऊन गेलोत... एम एसनं मला म्हटलं की प्रत्येक बॉलला ठोकायचं नाहीय... पण, त्यानं माझ्या ताकदीवरून मला प्रोत्साहन दिलं, असं रैनानं धोनीलाही आपल्या यशाचं वाटेदार करून घेतलं.
झिम्बॉम्वेचा कॅप्टन ब्रँडन टेलरनं अनेक संध्या गमावल्याबद्दल दु:ख व्यक्त केलंय. 'आम्ही चांगली खेळी केली पण काही संधी आम्ही गमावल्या. बॉलिंगमध्ये आम्हाला सुधारणा करायला हवी. भारतानं सिद्ध करून दाखवलंय की ते ग्रुपमध्ये शीर्ष स्थानावर का आहेत...' असं त्यानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.