आसाम : ९ वर्षाच्या चंदन बोरो या मुलाचं नाव तु्म्ही कधी ऐकलं नसेल. पण काही दिवसानंतर हा मुलगा भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार आहे. चंदन लवकरच फुटबॉल खेळण्यासाठी जर्मनीला जाणार आहे.
चंदनला जर्मनीच्या U Dream Football क्लबमध्ये ट्रेनिंग मिळणार आहे. लवकरच तो ज्यूनियर इंटरनॅशनल लीगमध्ये खेळतांना दिसणार आहे.
चंदनचे पिता हे एक सफाईकर्मचारी आहेत. तर त्याची आई ही चहा विकते. चंदनला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कोकराझार सेंटरमधून टाटा ट्रस्ट मुंबईने निवडलं आहे. U Sports आणि जर्मनीची U Dream Football सोबत टाटा ट्रस्टने फुटबॉल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये १५ वर्षापेक्षा कमी फुटबॉल खेळाडूंना निवडलं जातं.
चंदन काही दिवसानंतर जर्मनीच्या बिटबर्गमध्ये ट्रेनिंग घेतांना दिसणार आहे. चंदन भारतीय टीमसाठी खेळू इच्छितो आणि नॉर्थ-ईस्ट यूनाइटेड फुटबॉल क्लब हे त्याचं फेव्हरेट क्लब आहे.