... जेव्हा क्रिस गेल बॅट घेऊन युवीच्या अंगावर धावून जातो!

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नियोजित मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. मात्र, यामुळे दोन्ही टीम्सला त्याचा फायदाच झालाय. याच मॅचमध्ये क्रिस गेल युवराज सिंहच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. 

Updated: May 19, 2015, 10:25 AM IST
... जेव्हा क्रिस गेल बॅट घेऊन युवीच्या अंगावर धावून जातो! title=

मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नियोजित मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. मात्र, यामुळे दोन्ही टीम्सला त्याचा फायदाच झालाय. याच मॅचमध्ये क्रिस गेल युवराज सिंहच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. 

त्याचं झालं असं की, मॅच सुरू असतानाच पावसाला सुरूवात झाली. भिजण्यापासून वाचण्यासाठी सगळ्याच खेळाडुंनी पेव्हॅलियनकडे धाव घेतली. याच वेळी युवराज सिंगनं मैदानातून जाताना गंमतीमध्ये हलकाच धक्का दिला.

...आणि मग काय या दोघांमध्ये दोस्ताना दंगा सुरू झाला. क्रिस गेलनं बॅट घेतली आणि युवराजच्या पाठी त्याला पकडायला गेल धावताना दिसला. 

गंमतीची गोष्ट म्हणजे, नुकत्याच दाखल झालेल्या पावसामुळे उल्हासित झालेल्या वातावरणात युवी आणि गेलच्या मैत्रीपूर्ण भांडणाची मजा प्रेक्षकही घेत होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.