'लाल' चष्मा लावून गेलची तुफान बॅटिंग

आयपीएल -7 मध्ये ख्रिस गेलची बॅट खूप चालेल अशी अपेक्षा होती, मात्र तेवढं काही झालं नाही, मात्र कॅरेबियन प्रिमियर लीग म्हणजे सीपीएलमध्ये ख्रिस गेलने आपल्या फॅन्सना थोडंही निराश होऊ दिलं नाही. 

Updated: Jul 14, 2014, 07:34 PM IST
'लाल' चष्मा लावून गेलची तुफान बॅटिंग title=

ग्रेनडा : आयपीएल -7 मध्ये ख्रिस गेलची बॅट खूप चालेल अशी अपेक्षा होती, मात्र तेवढं काही झालं नाही, मात्र कॅरेबियन प्रिमियर लीग म्हणजे सीपीएलमध्ये ख्रिस गेलने आपल्या फॅन्सना थोडंही निराश होऊ दिलं नाही. 

जमैका तलावासकडून खेळणाऱ्या गेलने सेंट लुसियाविरोधातील सामन्यात 63 चेंडूत 111 धावांची तुफान खेळी केली. गेलने लाल चष्मा लावून ही तुफानी खेळी केली.

सेंट लुसियाने टॉस जिंकून पहिल्यांदा बोलिंगचा निर्णय घेतला. 20 षटकांत 5 विकेट गमावून 161 धावा केल्या. उत्तरादाखल गेलच्या टीमने 19 षटकांत लक्ष्य पार केलं, आणि 7 विकेटने विजय नोंदवला. गेल नाबाद राहिला. गेलने आपल्या तुफानी डावात, 5 चौकार आणि 10 षटकार लावले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.