रियो दि जिनेरिओ: फूटबॉल वर्ल्डकपमधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ब्राझीलचे कोच फिलीप स्कॉलरी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
फिफा वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये ब्राझीलला जर्मनीकडून ७-१ असा मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर सर्व स्तरांतून स्कॉलरींवर टीका झाली होती. तर वर्ल्डकपमधील तिसऱ्या स्थानासाठीच्या झालेल्या मॅचमध्येही नेदरलँड्सनं ब्राझीलचा ३-० असा पराभव केला. यामुळं स्कॉलरी यांच्यावर कारवाई होणं अटळ होतं. अखेर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
स्कॉलरी यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलनं २००२ साली फिफा वर्ल्डकप पटकावला होता. तर यंदा जर्मनीनं 24 वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकलेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.