प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं चॅम्पियन्स लीग टी-२० बंद

 क्रिकेटमधील चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्यात आलीय. प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. 

Updated: Jul 15, 2015, 01:37 PM IST
प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं चॅम्पियन्स लीग टी-२० बंद  title=

मुंबई :  क्रिकेटमधील चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्यात आलीय. प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. 

यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बीसीसीआय, ऑस्ट्रेलिया क्रिकेट आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेकडून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. पण प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यानं तिन्ही मंडळांनी एकमतानं हा निर्णय घेतलाय. 

बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी यासंबंधी माहिती दिलीय. २००९पासून ही स्पर्धा सुरू झाली होती.  पण ती यशस्वी ठरली नाही. आतापर्यंत सहा वेळा झालेल्या या स्पर्धेत दोन वेळा चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन वेळा मुंबई इंडियन्सनं जेतेपद पटकावलं. तर ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्स या टीम १-१ वेळा विजयी झाल्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.