आयपीएलमध्ये दोन टीमची जागा घ्यायला सात शहरं तयार

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमची जागा सात टीम्स घेऊ शकतात, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. 

Updated: Jul 15, 2015, 04:00 PM IST
आयपीएलमध्ये दोन टीमची जागा घ्यायला सात शहरं तयार title=

कोलकाता : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमची जागा सात टीम्स घेऊ शकतात, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. 
बीसीसीआय चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांची जागा भरण्याची व्यवस्था २०१६ च्या आयपीएलआधी करेल.
'आयपीएल स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं दिलेल्या निर्णयानुसार चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीम्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलीय. 
या दोन टीम्सना खरेदी करण्यासाठी आठ बिझनेस ग्रुप्स उत्सूक आहेत. २०१६च्या आयपीएलमध्ये ज्या दोन शहरांची टीम होऊ शकते त्यात पुणे आणि कोच्ची असू शकतात. या दोन्ही टीम्स यापूर्वी आईपीएलमध्ये खेळलेल्या आहेत.
त्याचबरोबर अहमदाबाद, इंदौर, रायपूर, रांची आणि कानपूर यांचाही समावेश आहे. तरी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीम्सला बदलण्याची घाई बीसीसीआय करताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे आईपीएलसाठी अजून आठ महिन्याचा अवधी आहे.
आयपीएलचा प्रसारक सोनीच्या करारानुसार या स्पर्धेसाठी किमान ६० मॅचेस खेळणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी आठ टीम्स खेळायला हव्या आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.