नवी दिल्ली : टीम इंडियाचा वन डे आणि टी-२० कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या आपले क्षण लष्करासोबत घालवत आहेत. पॅराजंपिंगची सध्या तो ट्रेनिंग घेत आहे. बुधवारी सकाळी त्याने ट्रेनिंगनंतर पहिल्यांदा १२५० फूट उंचावरून उडी घेतली.
धोनीने सकाळी ७ वाजता एएन-३२ विमानातून १२५० फूट उंचावरून उडी घेतली. त्याला आकाशातून जमिनीवर केवळ ७० मिनिटात खाली आला. धोनी आता अशा चार उड्या घेणार आहे.
धोनीने लष्कराच्या पॅरा रेजिमेंटसह दोन आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. लेफ्टनंट कर्नल ही मानद पदाने सन्मानित धोनीने अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी स्वतः भारतीय लष्कराला लिहिले होते.
त्यानंतर त्याने आग्रा येथील पॅरा प्रशिक्षण स्कूलमध्ये पॅराग्लायडिंग आणि स्काय डायव्हिंगचे प्रशिक्षण घेतले.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.