या तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकपचा सामना अखेरपर्यंत रंगला. क्रिकेटचाहत्यांची धडधड वाढवणारा असा हा सामना होता. एका क्षणी जल्लोष तर दुसऱ्याच क्षणी हिरमुसलेले चेहरे अशी अवस्था चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची होती. 

Updated: Mar 24, 2016, 11:44 AM IST
या तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला title=

बंगळूरु : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकपचा सामना अखेरपर्यंत रंगला. क्रिकेटचाहत्यांची धडधड वाढवणारा असा हा सामना होता. एका क्षणी जल्लोष तर दुसऱ्याच क्षणी हिरमुसलेले चेहरे अशी अवस्था चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची होती. 

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं नवव्यांदा घडलं की एखादा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला आणि एक धावेने विजय झाला. शेवटच्या तीन बॉलमध्ये तीन विकेट गमावणाऱ्या बांगलादेशने पहिल्यांदा अशा प्रकारे पराभवाचा सामना केला तर 

या तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला

१. भारताची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. मधल्या फळीतील फलंदाजींनी ज्याप्रमाणे शॉट लगावले त्यावरुन भारत मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले होते. मात्र स्लॉग ओव्हर्समध्ये फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. भारताने १४ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर ६ ओव्हरमध्ये ६० ते ७० धावा होण्याची अपेक्षा होती. मात्र केवळ ४६ धावा करता आल्या. 

२. भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी १४७ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशला पूर्ण न करु देण्यासाठी भारतीय गोलंदाज जोर लावत होते. मात्र फिल्डर्सनी अनेक झेल सोडले. भारताकडून कमीत कमी ३ झेल सोडण्यात आले. याचा फायदा बांगलादेशला झाला त्यामुळेच ही मॅच रंगतदार अवस्थेत पोहोचली. 

३. भारताने सामन्यादरम्यान अनेक झेल सोडले मात्र २०व्या षटकांतील चौथ्या चेंडूत मुशफिकर रहीमने मारलेला झेल धवनने पकडला आणि सामन्याचे चित्र पलटले. पुढच्याच चेंडूत महमद्दुलाहचा झेल रवींद्र जडेजाने घेतला. यावेळी बांगलादेशला दोन चेंडूत दोन धावांची गरज होती. मात्र या चेंडूतही विकेट गमावल्याने त्यांना एका चेंडूत २ धावा हव्या होत्या.