नागपूर : टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून यजमान भारताला ४७ धावांनी पराभवाचा धक्का बसला.
ऑस्ट्रेलिया, श्रीलंका दौऱ्यात त्यानंतर आशिया कपमध्ये विजयी कामगिरी करणाऱ्या भारताला न्यूझीलंडने चांगलाच धक्का दिला. या पराभवानंतर धोनीने फलंदाजांना जबाबदार धरलेय.
आम्ही त्यांना कमी स्कोर करण्यापासून रोखले होते. मात्र फलंदाजांना चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे खालच्या फळीतील फलंदाजांवर दबाव आला,असे धोनी म्हणाला.
यावेळी धोनीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. त्यांनी चांगली गोलंदाजी केली तसेच परिस्थितीचा चांगला फायदा उठवला. आमच्या संघात ताळमेळ दिसला नाही. आम्ही चांगला खेळ करु शकलो असतो. मात्र फलंदाजी ठेपाळली, असे धोनीने सांगितले.