क्रिकेटच्या मैदानात हाणामारी, खेळाडूवर आजीवन बंदी

क्रिकेटच्या मैदानात विरोधी टीमच्या खेळाडूंशी झालेलं भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. बरमुडामध्ये मागील आठवड्यात 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन' ट्रॉफी दरम्यान विलोकट्स आणि क्वीवलँड क्रिकेट क्लबमध्ये सामना खेळवण्यात आला, यात विकेटकीपर जेसन एंडरसनने विलोकटचा बॅटसमन ब्रायनवर हल्ला केला.

Updated: Sep 22, 2015, 04:38 PM IST
क्रिकेटच्या मैदानात हाणामारी, खेळाडूवर आजीवन बंदी title=

बरमुडा : क्रिकेटच्या मैदानात विरोधी टीमच्या खेळाडूंशी झालेलं भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. बरमुडामध्ये मागील आठवड्यात 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन' ट्रॉफी दरम्यान विलोकट्स आणि क्वीवलँड क्रिकेट क्लबमध्ये सामना खेळवण्यात आला, यात विकेटकीपर जेसन एंडरसनने विलोकटचा बॅटसमन ब्रायनवर हल्ला केला.

यानंतर दोन्ही खेळाडूंची मैदानावर जुंपली, त्यांनी एकमेकांना मारहाण केली, यानंतर एकमेकांनी बॅटने देखील हाणामारी केली. यानंतर मैदानातील इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्याने भांडण आटोक्यात आलं

सर्वात आधी हात उचलणारा खेळाडू जेसन एंडरसनवर क्लबने आजीवन बंदी लावली आहे. जेसन एंडरसन आयलँडचा स्टार क्रिकेटर समजला जातो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.