कोहली, धोनीचे रँकिंग घसरले, शमीला १४ स्थानांचा फायदा

 विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांची फलंदाजांच्या आयसीसी वन डे रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी १० स्थानावर खाली आहे. शिखर धवनने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. 

Updated: Mar 2, 2015, 04:23 PM IST
कोहली, धोनीचे रँकिंग घसरले, शमीला १४ स्थानांचा फायदा title=

ब्रिसबन :  विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांची फलंदाजांच्या आयसीसी वन डे रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी १० स्थानावर खाली आहे. शिखर धवनने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. 

वन डे गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रगती केली आहे. शमीला १४ स्थानांचा फायदा झाला असून त्याने ११ व्या स्थानावर उडी घेतली आहे. तर अश्विनला सहा स्थानांचा फायदा होऊन तो १६ व्या स्थानावर पोहचला आहे. 

वर्ल्ड कपच्या २३ पूल सामन्यांमध्ये रँकिंगमध्ये खूप बदल झाले. कोहली एक स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे. तर धोनी दोन स्थानाने घसरून १० व्या स्थानावर गेला आहे. 

रोहित शर्मा आणि सुरेश रैना पहिल्या २०मध्ये असून रोहित शर्माला तीन स्थानांचे नुकसान होऊन तो १६ व्या स्थानावर पोहचला आहे. तर रैनाला चार स्थानांचा फायदा झाला असून तो २० व्या स्थानावर पोहचला आहे. 

श्रीलंकेचा कुमार संघकारा दोन स्थान वर येऊन दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलासोबत दुसरे स्थान शेअर करतो आहे. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स वन डे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. 

गोलंदाजांमध्ये कोणताही भारतीय गोलंदाज पहिल्या १० मध्ये नाही. शमी आणिि अश्विन यांनी चांगली प्रगती केली आहे. जखमी भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजा यांना चार स्थानांचे नुकसान झाले आहे. ते अनुक्रमे १७ व्या आणि १८ व्या स्थानावर आहेत. गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा सईद अजमल पहिल्या स्थानावर आहे. पण तो वर्ल्ड खेळत नाही आहे. 

ऑलराउंडरच्या यादीत जडेजा सातव्या स्थानावर कायम आहे. पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये २२९ धावा काढल्या आणि तीन विकेटही घेतल्या आहेत. 

टीम रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया १२० अंकानी पहिल्या स्थानावर आहे. तर ११६ अंकासह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ११३ अंक मिळवून दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड पाचव्या आणि इंग्लड सहाव्या स्थानावर आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.