सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं पुन्हा निराशा करत पहिल्या इनिंगमध्ये १८९ रन्स बनवल्या.

Updated: Mar 5, 2017, 06:12 PM IST
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी title=

बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं पुन्हा निराशा करत पहिल्या इनिंगमध्ये १८९ रन्स बनवल्या. यानंतर भारतीय बॉलर्सनी चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या सहा बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २३७/६ एवढा होता.

आता ऑस्ट्रेलियाकडे ४८ रनची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. या टेस्ट मॅचमध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी उद्या कोहलीच्या टीमला कांगारू टीमला लवकर ऑल आऊट करावं लागेल, अन्यथा पुण्याप्रमाणेच बंगळुरूमध्येही पराभवाची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.