भारताने दाखवून दिले, कोणालाही हरवू शकतात - मॉर्कल

टीम इंडियाने मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेला ज्या प्रकारे नमवले त्यावरून असे दिसून येते की ते विद्यमान वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया कोणत्याही संघाला नमवण्याची ताकद ठेवतात, असे दक्षिण आफ्रिका ऑल राऊंडर एल्बी मॉर्केलने टीम इंडियावर स्तुतीसुमने वाहिली आहे. 

Updated: Feb 25, 2015, 08:39 PM IST
भारताने दाखवून दिले, कोणालाही हरवू शकतात - मॉर्कल title=

मुंबई : टीम इंडियाने मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेला ज्या प्रकारे नमवले त्यावरून असे दिसून येते की ते विद्यमान वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया कोणत्याही संघाला नमवण्याची ताकद ठेवतात, असे दक्षिण आफ्रिका ऑल राऊंडर एल्बी मॉर्केलने टीम इंडियावर स्तुतीसुमने वाहिली आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कपच्या अखेरच्या १५ मध्ये स्थान मिळून न शकलेला मॉर्कल स्थानिक क्रिकेटच्या सत्रानंतर आजकाल सुट्टी घालवत आहेत. त्याने भारत आणि दक्षिण आफ्रिका संपूर्ण सामना पाहिला. त्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला. 

आयपीएलमध्ये अनेक भारतीय खेळाडूंसोबत खेळलेल्या मॉर्कलने म्हटले की, मी मॅच पाहिली. पण त्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे नव्हता. निश्चितच तो दक्षिण आफ्रिकेसाठी चांगला दिवस नव्हता. जेव्हा भारताचा चांगला दिवस असेल तर ते कोणत्याही संघाला वाईट पद्धतीने पराभूत करू शकतात. मेलबर्नमध्ये असेच झाले पण यातून दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा उभारी घेईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.