गावसकर मुक्त झाले; मानधनही मिळणार!

 भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या हंगामी अध्यक्षपदावरून मुक्त झाले आहेत. 

Updated: Jul 19, 2014, 11:20 PM IST
गावसकर मुक्त झाले; मानधनही मिळणार!  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या हंगामी अध्यक्षपदावरून मुक्त झाले आहेत. 

हायकोर्टानं गावसकर यांना पदमुक्त करत असल्याचा आदेश काढलाय. त्याचबरोबर शिवलाल यादव यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड कायम ठेवली. 

आयपीएलमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 28 मार्चला गावसकर यांच्याकडे आयपीएलपुरती बीसीसीआयच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला होता. त्याचबरोबर आयपीएल वगळून अन्य कार्यभार यादव यांच्यावर सोपवण्यात आला होता. 

पण, काही दिवसांपूर्वी माझी नेमकी भूमिका कोणाती? तसंच कार्यभार भूषवलेल्या कालावधीचे मानधन मिळावं यासाठी सुनील गावसकर यांनी न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती. 

याच संदर्भात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालाने गावसकर यांना पदमुक्त करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय. त्याचबरोबर बीसीसीआयला त्यांचे मानधन देण्यासही सांगण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.