विराट कोहली अनुष्काबद्दल असं का बोलला?

माझ्या खासगी आयुष्यात कोणी डोके खुपसलेले आवडत नाही. त्यामुळे मला राग येणे स्वाभाविकच आहे, असे सांगून अनुष्का माझी शक्ती आहे, असे टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार विराट कोहली म्हणाला.

Updated: Apr 15, 2015, 04:18 PM IST
 विराट कोहली अनुष्काबद्दल असं का बोलला?   title=

बंगळुरु : माझ्या खासगी आयुष्यात कोणी डोके खुपसलेले आवडत नाही. त्यामुळे मला राग येणे स्वाभाविकच आहे, असे सांगून अनुष्का माझी शक्ती आहे, असे टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार विराट कोहली म्हणाला.

खेळाच्या मैदानाबाहेर विराट कोहलीची  जोरदार चर्चा  आहे ती अनुष्का-विराट कोहली यांच्या प्रेमप्रकरणामुळे. विराटने आपल्या प्रेयसीचे समर्थन केले आहे. अनुष्काची सोबत मला आवडत असून ती माझी शक्ती आहे, असे विराट म्हणाला.

विराटने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने प्रेमाची कबुली दिली. अनुष्कासोबत माझे एक वेगळे नाते आहे. विश्वकप स्पर्धेनंतर हे नाते अधिक घट्ट झालेय. आमच्या दोघांमधील प्रेम अधिक घट्ट झाले आहे. माझ्या प्रेमाबाबत कुणी वाईट बोलले तर मला राग येणे स्वाभाविक आहे. कारण ते माझ्या खासगी जीवनात हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे विराट रागाबाबत म्हणाला.

अनुष्का माझी शक्ती आहे. ज्या वेळी ती माझ्यासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, त्या वेळी माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. अनुष्का मैदानावर उपस्थित असल्यानंतर मला विशेष आनंद मिळतो, अशी कबुली विराटने दिली.

एका पत्रकाराला धमकावले होते. यावर विराट म्हणाला, माझे कधी-कधी स्वत:वर नियंत्रण राहत नाही; पण कुणी जर माझ्या खासगी जीवनाबाबत उलटसुलट बोलत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे, असे समर्थनही केले.

मी माझे जीवन क्रिकेटला समर्पीत केले आहे. याचा लोकांनी विचार करायला हवा. माझ्या हृदयाची स्पंदनं ‘भारता’साठी असतात आणि त्यामुळेच मैदानावर उतरल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याची माझ्या संघाला व अधिकाऱ्यांना चांगली कल्पना आहे. त्यामुळे मला कोणापुढे ते सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.